तेलंग इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक पर्यटन दिन साजरा 

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ सप्टेंबर २०२२

पिंपरी-चिंचवड


कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ.अरविंद ब.तेलंग इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे “जागतिक पर्यटन दिन”  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून  वीणा वर्ल्ड, चिंचवड शाखेच्या सेल्स विभाग प्रमुख  शर्वरी शिंदे,  झेड एस असोसीएट च्या ट्रॅव्हल समन्वयक  रुपाली सुर्यवंशी आणि  सीईएस डॉ.अ.ब तेलंग आयएचएमचे प्राचार्य डॉ. अजयकुमार एम. राय हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दिप्रज्वलनाने होवून प्रा.सौरभ जाधव यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला तसेच प्राचार्य डॉ.अजयकुमार राय यांनी उपस्थित अतिथींचे स्वागतपर भाषण केले त्यामध्ये त्यांनी यावर्षी जागतिक पर्यटन दिनाचा विषय ” रिथिंकींग टुरिझम ”  या विषयी विस्तृत माहिती सांगितली.  दरवर्षी पर्यटन दिवस हा वेगवेगळ्या संकल्पनेवर साजरा केला जातो. “पर्यटनाचा पुनर्विचार” हि संकल्पना यावर्षी असल्याने सर्व अतिथिनी त्याविषयी माहिती देत पर्यटनाचे महत्व समजून सांगितले.

दिवसेंदिवस वाढणारा उन्हाचा कडाका.. त्यात अवेळी पडणाऱ्या पावसाची भर.. हा परिमाण आहे तो जागतिक तापमानवाढ अर्थात ‘ग्लोबल वॉर्मिंगचा’. जागतिक तापमानवाढ, कार्बन डायॉक्साईड, ओझोन अशा अनेक नैसर्गिक कारणांचा परिणाम केवळ नैसर्गिक परिसंस्थेपुरता मर्यादित नसून पर्यटन व्यवसायावर देखील होतो. असे असूनही ‘पर्यटन’ हा एक ‘आंतरराष्ट्रीय स्तराचा’ उद्योग बनला आहे, जो अर्थव्यवस्थेच्या सर्वात मोठ्या उत्पन्नाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, भारताच्या अर्थव्यवस्थेत इतर देशांच्या तुलनेत प्रवास आणि पर्यटन महत्वपूर्ण भूमिका बजावते. गेल्या काही वर्षांत पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली असल्यामुळे या क्षेत्राची उलाढाल सांगायची तर २०१८ या वर्षात पर्यटन व्यवसायातून भारताला २८.६ अब्ज डॉलरची कमाई झाली.

पण २०२० मध्ये एकाएकी करोनाचे संकट आले आणि त्याचा सर्वाधिक फटका झेलणाऱ्या इंडस्ट्रींपैकी एक म्हणजे पर्यटन. टुरीझम हे फक्त ब्रेक घेऊ शकते ते कायम स्वरुपी कदापीही बंद होणार नाही हे नक्की. त्यामुळेच कोरोना महामारीनंतर लोकांनामध्ये पर्यटनाचे महत्व मोठ्या प्रमाणात वाढले असून पर्यटन उद्योगात परिवर्तन घडवून आणण्याची गरज निर्माण झाली आहे आणि पुन्हा तेवढ्याच जोमाने पर्यटन व्यवसाय उभा करायचा आहे. यावर्षी देखील “जागतिक पर्यटन दिनानिमित्त” विद्यार्थ्यांनसाठी उत्कृष्ट पर्यटन स्थळाची माहिती देणारे पोस्टर, उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट वेशभूषा आणि उत्तम स्थानिक पदार्थ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेवून जागतिक पर्यटन दिनाचा आनंद लुटला. त्यानंतर मिस.शर्वरी शिंदे यांनी या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिरण्याची आवड असायला हवी तसेच संवाद कौशल्य उत्तम असणे आणि दोनपेक्षा अधिक भाषेवर प्रभुत्व असायला हवे. काही परदेशी भाषा आत्मसात असल्यास खूप फायद्याचे ठरते. भौगोलिक प्रदेशांची उत्तम जाण असायला हवी. त्याचबरोबर त्या देशाचा इतिहास, कला आदीची प्राथमिक माहिती हवी असे सांगून बहुमुल्य असे  मार्गदर्शन केले. तर पर्यटन व्यवसायात लाखो लोक काम करतात.

पर्यटन व्यवसायाची उलाढाल पण अब्जावधी रुपयांत गेली आहे. स्थानिक पातळीवर जनतेला रोजगार संधी पर्यटनामुळे उपलब्ध होत आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जो देश स्वतःच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न करील, लोकांना आकर्षित करील त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनामुळे खूप मदत होणार आहे. सिंगापुर सारखे काही देश पर्यटन या क्षेत्रावर पूर्णपणे अवलंबून आहेत. वर्षभरात “पर्यटन” या क्षेत्रात प्रत्येक वर्षी २५ टक्क्याने वाढ होते. पर्यटन व्यवस्थापन आणि नियोजन या अभ्यास शाखाही आता महाविद्यालयीन शिक्षणात आल्या आहेत. देशातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो आहे. अधिक शाश्वत, सर्वसमावेशक आणि लवचिक क्षेत्रासाठी आपण पर्यटन कसे करतो याचा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे असे मिस. रुपाली सुर्यवंशी यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *