महापुरुषांच्या अपमानाच्या निषेधार्थ आज पिंपरी-चिंचवड शहर बंद

०८ डिसेंबर २०२२


छत्रपती शिवाजी महाराजांवर वारंवार होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलं तापलं आहे. शिवरायांवर करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता शिवरायांवर होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज पिंपरी चिंचवड शहर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

भाजपा व्यतिरिक्त इतर सर्व संघटनांनी एकत्र येत पिंपरी चिंचवड शहर उद्या दिवसभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच भारतीय जनता पक्षातील काही नेते मंडळी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य करून महाराजांची बदनामी करण्याचा घाट घालत आहेत असा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे. याला कुठेतरी आळा बसावा म्हणून आज (८ डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहरात बंद ठेवण्यात येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *