थकीत दंड भरण्याचे आरटीओचे आवाहन

२९ डिसेंबर २०२२

पिंपरी


शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे वाहनांवर केलेल्या कारवाईमधून दंड भरून सात दिवसांत नागरिकांनी आपली वाहने सोडवून घेण्याचे 1 आवाहन आरटीओने केले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने आकारलेला दंड तसेच वाहनकराची रक्कम भरून कार्यालयाच्या आवारात असलेली वाहने परत घेण्याचे आदेश दिले आहेत . थकीतकराच्या वसुलीसाठी वाहनांचा जाहीर लिलाव प्रक्रिया सुरू असून , अद्यापपर्यंत १८ वाहन मालकांना नोंदणीकृत पत्यावर नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. तशा सूचनादेखील कार्यालयाच्या फलकावर प्रदर्शित केल्या आहेत. सात दिवसांत वाहने सोडवून घ्यावीत , अन्यथा बेवारस वाहने समजून जाहीर ई लिलाव करण्यात येईल , असे उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *