पिंपळे सौदागरमध्ये शोभायात्रेतून एकात्मतेचा संदेश; विविध सेवाभावी मंडळ व संस्थांचा समावेश

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) :

पिंपळे सौदागर भागात गुढीपाढव्यानिमित्त बुधवारी (दि. २२) भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोलताशाचा दणदणाट करत प्रभु श्री रामाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. कुंदाताई यांच्यासह महिलांनी लेझीमचा ठेका धरुन समाजात एकात्मतेचा संदेश दिला.

या शोभायात्रेत वारकरी, सत्यभामा, ज्ञानाई, विठ्ठल रुक्‍मिनी, गुरु माऊली महिला मंडळांचा समावेश होता. नवचैतन्य हास्य क्‍लब, विविध विकास समित्यांच्या सदस्यांनी सहभाग घेतला. पीके स्कूलच्या बॅंड पथकाने यात्रेत रंगत आणली. लेझीम समुहात महिलांनी सहभाग घेतला. पथनाट्य समुहातून सामाजिक संदेश दिला. टॅलेंट फॉर नेशन फाऊंडेशन, लायनेस क्‍लब, आर्ट ऑफ लिव्हिंग, योग विद्या धाम, इसकॉन, कलावती देवी उपासना केंद्र, गायत्री परिवार, जगतगुरु कृपाळू महाराज परिषद, एक मुठ्ठी अनाज, शिवतेज कबड्डी मंडळ, लाड शाखीय वाणी समाज, संघ परिवार आणि पिंपळे सौदागर येथील रहिवाशांनी शोभायात्रेत सहभाग घेतला.

कुंदाताई म्हणाल्या, गुढीपाडवा हा मराठी नववर्षाच्या स्वागताचा सुवर्णक्षण आहे. आगामी वर्षात सर्वानी एकात्मतेचा संकल्प केला पाहिजे. आज स्त्री-पुरुष समानतेचे प्रतीक म्हणुन शोभा यात्रेत आम्ही सर्वजण सहभागी झालो आहोत. ही समानता टिकून ठेवण्यासाठी उन्नती सातत्याने प्रयत्न करीत आली आहे.

भाजप चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख शंकरशेठ जगताप, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे,पी.के इंटरनेशनल स्कूल चे संस्थापक जगन्नाथ काटे ,विजयआणा जगताप, निलेश जगताप, कैलास कुंजीर, अतुल पाटील, मनोज ब्राह्मणकर, समाजसेवक जयनाथ काटे, उद्योजक सोमनाथ काटे, महेंद्र झिंजुर्डे, विठ्ठल झिंजुर्डे, चेअरमन विजय भांगरे , प्रवीण कुंजीर ,संजय भिसे आदींनी सोभायात्रेसाठी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *