ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास ने महागणपतीस अभिषेक करत केले वृक्षारोपण

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
१६ जून २०२२

रांजणगाव गणपती


जगविख्यात भारताचे थोर समाजसेवक व लोकपाल चे जनक, अण्णासाहेब हजारे यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त, भ्रष्टचार विरोधी जन आंदोलन न्यास च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी, रांजणगाव गणपती येथील अष्टविनायक पैकी एक असलेल्या महागणपतीला महा अभिषेख व पूजा करत, अण्णा हजारे यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावे यासाठी प्रार्थना केलीय.

त्याचप्रमाणे रांजणगाव गणपती, कोंढापुरी, कारेगाव, मोराची चिंचोली, केंदूर, मलठण या गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या गावांत झालेल्या वृक्षारोपणावेळी तेथील सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पं. सदस्य, आजी माजी सरपंच, सदस्य, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांनी हजर राहत वृक्षारोपणात सहभाग घेतला. यावेळी उपस्थित लोकांना राळेगण सिद्धी येथून प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यात माहिती अधिकार माहिती पुस्तिका व मार्गदर्शिका, राळेगणसिद्धी कायाकल्प, अनुभवाचे बोल आदी पुस्तकांचा समावेश होता. हे वृक्षारोपण शिरूरचे गटविकास अधिकारी यांच्या सूचना व निर्देशांनुसार “बिहार पॅटर्न” प्रमाणे करण्यात आले आहे. तसेच येत्या काही दिवसांत “बिहार पॅटर्न” प्रमाणेच, संपूर्ण शिरूर तालुक्यातही वृक्षारोपण करण्याचा निर्धार यावेळी न्यास च्या वतीने करण्यात आला आहे.

बिहार पॅटर्न म्हणजे, गावातील नवीन करण्यात येत असणाऱ्या वृक्षारोपणातील काही ठराविक संख्येच्या वृक्षांच्या संवर्धन व जोपासण्याची जबाबदारी एका कुटुंबाला दिली जाते. शासनाच्या “नरेगा” या स्कीम अंतर्गत त्या कुटुंबाला एक “जॉबकार्ड” दिले जाते व त्यातून त्याला वर्षभर रोजगार व मानधनही मिळते. त्या कुटुंबाने या वृक्षांची खत, पाणी देत योग्य अशी देखभाल व जोपासना करायची असते. सदर रोपे/वृक्ष हे वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायतींना त्यांच्या मागणीनुसार मोफत पुरविली जातात. याच बिहार पॅटर्नचा सदुपयोग शिरूर तालुक्यात करण्याचा ध्यास, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासच्या राष्ट्रीय समन्वयक समितीचे सदस्य, तसेच पुणे जिल्ह्याचे माजी संघटक शीवाजी खेडकर व टीमने घेतल्याची त्यांनी माहिती दिली. त्यासाठी यांच्यासह न्यास चे तालुकाध्यक्ष सतीश गायकवाड, उपाध्यक्ष बाजीराव भोसुरे, शंकर ढवळे, तुषार कुटे, अमोल पाचुंदकर, नितीन थोरात, अभिजित जावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे व वृक्षारोपण करण्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

 

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *