या चिमण्यांनो परत फिरा….’स्वतःचे घर’ मनीष काळभोर यांचे वाढदिवसानिमित्त चिमण्या पाखरांना अनोखी भेट

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १४ जून २०२१
पिंपरी-चिंचवड शहरात अनेक जण आपला वाढदिवस साजरा करतात. काहीजण वाढदिवसाचे औचित्य साधत अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवितात. पण आकुर्डी काळभोर नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मनीष काळभोर आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
यानिमित्त शहरात त्यांनी चिमण्यांसाठी घरे बसविण्याचा उपक्रम हाती घेऊन राबविला .

सकाळी शहरातील झाडांवर ही घरटी बसविण्यात येणार असून यामुळे चिमणी या पाखरांना स्वतःचे घर मिळणार आहे. यानिमित्त शहरातून लुप्त होत चाललेल्या चिमण्यांना नक्कीच दिलासा मिळेल. ”या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या” या कवितेच्या चार ओळी या घरच्यांवर लावून एक प्रकारे चिमण्या पाखरांना आवाहनही केले जात आहे.
मनीष काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी आठ वाजता मोरया गोसावी मंदिरात अभिषेक करण्यात आला असून देशावरील कोरोना चे संकट दूर व्हावे म्हणून प्रार्थना करण्यात आली.

Advertise


यावेळी काळभोर नगर येथील मदर तेरेसा होम येथे सकाळी 10 वा अन्नदान, सकाळी 10.30 वा. काळभोर नगर, मोहन नगर परिसरात सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले असून सायंकाळी सात वाजता काळभोर नगर जनसंपर्क कार्यालय येथे मोजक्याच मित्र मंडळींमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .
या उपक्रमास जगदंब प्रतिष्ठान, राष्ट्र तेज तरुण मंडळ, सी इ ओ ग्रुप, हिंदवी स्वराज्य संघटना, अचानक मित्र मंडळ, खंडेराया मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, एच एस आर स्पोर्ट्स क्लब, चांगभलं प्रतिष्ठान, श्री गणेश प्रसारक ट्रस्ट, सूर्योदय मित्र मंडळ, आदींचे सहकार्य लाभले.