ब्रेक निकामी झालेल्या बसने दिली अनेक वाहनांना ठोकर; दोघे गंभीर जखमी

दि. २९/१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : पुण्यातील वाकडेवाडी येथे बुधवारी रात्री 8 च्या सुमारास ब्रेक निकामी झाल्याने एका पीएमपीएमएल बसने दुचाकीस्वारासह अनेक गाड्यांना धडक दिली. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले असल्याचे समजते.

बसचे ब्रेक निकामी झाल्याने या बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला. बसने समोरून जाणाऱ्या दोन दुचाकींसह रिक्षा, टेम्पो आणि एका टाटा 407ला धडक दिली. बसने एका दुचाकीस्वाराला फरपटत नेले.

या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून कारच्या कारमध्ये मागे बसलेली एका महिला देखील जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *