अनधिकृत बांधकामावर कारवाई

दि. २८/१२/२०२२
पुणे


पुणे : पुणे महापालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कर्वे रोड येथे बुधवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करून एकूण सुमारे २१ हजार ५५० चौरस फूट क्षेत्र मोकळे केले.

बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर कदम, कार्यकारी अभियंता बीपीन शिंदे, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त राजेश गुर्रम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता उदय कोदे, कनिष्ठ अभियंता विठ्ठल मुळे, गजानन मारणे यांनी ही कारवाई केली. ही कारवाई ३ ट्रक व १ जेसीबी, १० कर्मचारी, ३ पोलीस, यांच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली. यापुढे देखील सातत्याने अशीच कारवाई केली जाणारा असल्याची माहिती यावेळी अतिक्रमण विभागाने दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *