ट्विटरचे मालक एलोन मस्क यांची नवी घोषणा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०२ नोव्हेंबर २०२२


ट्विटरच्या ब्लू टिक यूझर्सकडून महिन्याला ८ डॉलर म्हणजेच सुमारे ६६० रुपये वसूल करण्याची घोषणा एलॉन मस्क यांनी केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून मस्क यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यातच त्यांनी आणखी एक समाधानकारक घोषणा केली आहे.

एका हाताने द्या, एका हाताने घ्या, ही पॉलिसी एलॉन मस्क यांनी जाहीर केली आहे. एका ट्विटद्वारे ते म्हणाले, कंटेंट पब्लिशर्सना कमाई करण्याची संधीदेखील ट्विटरद्वारे दिली जाईल. जे लोक कंटेंट देतात. उदा. न्यूज चॅनल, न्यूज वेबसाइट किंवा इन्फ्लूएंसर्सचे कंटेंट किंवा व्हिडिओद्वारे होणाऱ्या कमाईद्वारे त्यांना कमाई करता येईल. नव्या धोरणांनुसार, ट्विटरच्या ब्लू टिक यूझर्सचे रिप्लाय, सर्च आणि मेंशनमध्ये प्राधान्य यांना प्राधान्य दिले जाईल. यासह ट्विटरवर दीर्घ व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करता येतील. तसेच ट्विटरवर टेक्स्ट पोस्ट करण्याची शब्दमर्यादादेखील वाढवली जाईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *