मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा

२८ डिसेंबर २०२२


मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेबांची शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने आता ताबा घेतला आहे. आतापर्यंत हे कार्यालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे होते.

नुकतेच नागपूर येथील हिवाळी अधिवशेनात देखील शिंदे गटाने शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला होता. त्यामुळे हे कार्यालय दोन्ही गटांना विभागून देण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेच्या पक्ष कार्यालयावर ताबा घेण्यासाठी शिंदे गटाकडून खासदार राहूल शेवाळे, नगरसेवक शीतल म्हात्रे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, यशवंत जाधव, अशोक जाधव व इतर नेते उपस्थित होते. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी सर्वना बाहेर काढले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *