माजी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी जर्वरी सोसायटीतील नागरिकांच्या समस्यावर काढला तोडगा…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि ३ जुलै २०२१
जर्वरी सोसायटीतील नागरिक रस्त्याची समस्या,मेन गेटची समस्या व इतर विविध समस्यानी त्रस्त होते. या समस्यांची दखल घेत मा. विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी जर्वरी सोसायटीमध्ये थेट नागरिकांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. या अडचणींवर महानगरपालिकेतील स्थापत्य विभाग आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यासोबत जर्वरी सोसायटीमध्ये आज दि. 3जुलै 2021 रोजी बैठक घेऊन विविध प्रश्नावर चर्चा करून लगेच समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या.

यावेळी महानगरपालिकेचे प्रभाग इंजिनियर श्री. नरेश जाधव, स्मार्ट सिटीचे इंजिनियर श्री. स्वामी तसेच जर्वरी सोसायटीचे चेअरमन श्री. गौरव नागरे व पदाधिकारी श्री. सागर बीरारी,श्री.चेतन खैरनार, श्री. अमोल मराठे, श्री. जॉर्ज जोसेफ,श्री. पराग खोकले, श्री. अनिल देसाई, श्री. गणेश देवकुळे,श्री. आशुतोष आजबे, श्री. गोपाल तलरेजा व ज्येष्ठ नागरिक श्री.लक्ष्मण पाटील व सोसायटी मधील नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांचे आभार मानले.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *