शिरूर काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात मोदी शासनाचा निषेध व शासनास निवेदन..

विभागीय संपादक
रविंद्र खुडे
शिरूर : दि. 15/07/2021

      शिरूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करून केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये काँग्रेसची मीटिंग आयोजित केली होती. त्या मिटिंग वेळी शिरूर तालुक्यातील विविध समाजातील 51 कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार संजय जगताप व विद्या सहकारी बँकेचे संचालक तसेच पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे खजिनदार महेशबापू ढमढेरे, यांच्या मार्गदर्शनाखाली दरवाढ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिरूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
       हे निवेदन निवासी नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांनी स्वीकारले. याप्रसंगी शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव, शिरूर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा प्रियांका बंडगर, शिरुर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष ॲड. किरण आंबेकर, शिरूर शहर युवक अध्यक्ष अमजद पठाण, शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते रामदास थोरात, उपाध्यक्ष संतोष शिंदे, शिरूर तालुका लीगल सेलचे अध्यक्ष ॲड. निलेश कर्डिले, उपाध्यक्ष बाफना, शिरूर तालुका महिला काँग्रेस कमिटी उपाध्यक्षा अरुणा मोहोळ, युवक अध्यक्ष संकेत गवारे, कार्तिक बाळसराफ, ज्योती हांडे,  चंदना गायकवाड, शितल हांडे, अजीम सय्यद, इत्यादी पदाधिकारी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *