गायरान जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर अब्दुल सत्तारांचं विधानसभेत स्पष्टीकरण

२८ डिसेंबर २०२२


कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांना सत्तार काय उत्तर देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यापैकी वाशिम येथील गायरान जमीन खासगी व्यक्तीच्या नावे करून देण्याचा आरोप आहे. सत्तार यांनी आज विधानसभेत यावर स्पष्टीकरण दिलं. तर टीईटी घोटाळ्यातील गैरव्यवहाराचा वापर अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मुलींना नोकरी लावण्यासाठी करून घेतल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात उच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो मला मान्य असेल – अब्दुल सत्तार

वाशिम येथील जमिनीचं हे प्रकरण आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गायरान जमीन प्रकरणी निरीक्षण नोंदवलेलं आहे. त्याकडे दुर्लक्ष करत सत्तार यांनी दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.योगेश खंडारे नामक व्यक्तीला वाशिम जिल्ह्यातील ३७ एकर जमीन नियमित करून दिल्याचा हा आरोप आहे. विधानसभेत बोलताना, शासन निर्णयानुसार, काही जमिनी भूमीहीन शेतकरी, अनुसूचित जाती जमाती या व्यक्तींना प्रदान करणे अनुज्ञेय आहे. शासनाच्या निर्णयानुसार अशा व्यक्तींची अतिक्रमणं नियमित करण्याचे निर्णय यापूर्वी अनेकवेळा घेण्यात आले आहेत. त्यात शाळा, दवाखाने, सार्वजनिक बांधकामे यासाठी हे नियम शिथिल करण्यात येतात.

या प्रकरणातील मागासवर्यीय, आदिवासी समाजाचे प्रमुख लोक होते, त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला आहे. माझावर जे आरोप केलेत, त्यानुसार हायकोर्ट मला जी शिक्षा देईल, ती मान्य आहे. या आदेशामुळे कोणताही फायदा किंवा नुकसान झालेलं नाही. महसूल मंत्री यांच्यासमोर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावर कोर्ट जो निर्णय देईल, तो मान्य असल्याचं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलं. तर टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलीच लाभार्थी असल्याचा आरोप आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. सत्तार यांच्या मुली या पात्रता परीक्षेत अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या प्रक्रियेत त्यांना नोकरी लागलेली नसल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *