मंचर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना माजी सरपंच दत्ताभाऊ गांजळे, व अक्षय TVS शोरूम मंचर च्या वतीने 240 N95 मास्क चे आणि 150 बॉटल सॅनिटाईझर चे वाटप…

मंचर,दि.23

प्रतिनिधी, निवासी संपादक पवन गाडेकर

कोरोनाच्या काळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून कार्य तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी माजी सरपंच दत्ताभाऊ गांजळे, व अक्षय TVS शोरूम मंचर च्या वतीने मंचर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना 240 N95 मास्क चे आणि 150 बॉटल सॅनिटाईझर चे वाटप करण्यात आले.


अक्षय TVS चे मालक अक्षय कोल्हे, यांनी हे मास्क आणि सॅनिटाईझर मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्याकडे सुपूर्त केले.यावेळी अक्षय कोल्हे,अक्षय विधाटे ,रुपेश मोरडे,राजेश कोकणे,अतुल लोंढे आदी उपस्थित होते. ,,, कोरोना मुळे व लॉकडाऊनमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे समाजातील सदन व्यक्तींनी आपल्या आसपासच्या वैद्यकीय अस्थापनांना व फ्रंटलाईन वरकर्स ला सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन माजी सरपंच,दत्ताभाऊ गांजळे यांनी यावेळी केले.या मदतीबद्दल पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी माजी सरपंच दत्ताभाऊ गांजळे व अक्षय कोल्हे यांचे आभार मानले.