मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा – विभागीय संपादक रामदास सांगळे

लक्ष्मण दातखिळे
बातमी प्रतिनिधी
२८ फेब्रुवारी २०२२

बेल्हे


जगात ११३ देशांमध्ये मराठी भाषा बोलली जात असून १२ कोटी जनता मराठी भाषिक आहे. जगात मराठी भाषेचा १० क्रमांक असून मराठी भाषेसारखे दर्जेदार साहित्य देशात नाही, अनेक हिंदी चित्रपट हिट होण्यासाठी चित्रपटांमध्ये मराठी भाषेचा तडका देतात, अशा आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा अशी मागणी आपला आवाज न्यूज विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी बेल्हे येथील मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात केली.

मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे महाराष्ट्रातील थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून त्यांचा २७ फेब्रुवारी हा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये साजरा करण्यात आला. या वेळी ते विद्यार्थ्यांशी बोलत होते. यावेळी मराठी दिनाचे व मराठी भाषेचे महत्व संस्थेचे सीईओ शैलेश ढवळे व प्राचार्या विद्या गाडगे यांनी सांगितले. साहित्यिक अनिल साबळे यांनी विद्यार्थ्यांना मराठी कविता गाऊन सांगितल्या तसेच शाळेला कविता संग्रह भेट दिले.

या प्रसंगी सनय प्रकाशन संस्थेचे व्यवस्थापक शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. साहित्यिक अनिल साबळे, साहित्यिक नागेश शिंदे, संस्थेचे सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, शाळेच्या प्राचार्या विद्या घाडगे उपप्राचार्य के.पी सिंग, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सावकार गुंजाळ व अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, संचालक मंडळांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *