बांधकाम परवानगीसाठी आता सोयीस्कर परवानग्या : PMRDA ने केले विकेंद्रीकरण

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
२० डिसेंबर २०२२

शिरूर (पुणे)


पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) एकूण क्षेत्र 6914.26 चौ.कि.मी. असून, सन 2011 च्या जनगणनेनुसार प्रदेशाची एकूण लोकसंख्या 73.21 लक्ष होती. पुणे महानगर प्रदेशामध्ये एकूण 2 महानगरपालिका, 7 नगरपालिका, 2 नगर पंचायत, 3 कॅन्टोन्मेंट बोर्ड, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन (MADC) व 814 गावांचा समावेश आहे. सदर भागातून प्राधिकरणाकडे विविध अर्जदार, वास्तुविशारदांकडून प्राधिकरण हद्दीतील भूखंडांवर रहिवास, औद्योगिक व वाणिज्य वापराकरिता बांधकाम परवानगी मिळणेबाबत विविध नविन / सुधारित प्रस्ताव सादर केले जात होते. परंतु आता नागरिकांच्या सोयीकरिता सदर प्रस्ताव हे शिघ्रतेने व कार्यक्षमतेने पार पाडण्याच्या दृष्टीने, क्षेत्रफळ निहाय बांधकाम परवानगी देण्याबाबतचे अधिकार प्रदान करण्यात आलेले असून ते पुढीलप्रमाणे आहेत.

1) 0 चौ. मी. ते 500 चौ. मी. पर्यंत -नगर रचनाकार.
2) 500 चौ. मी. ते 1000 चौ. मी. पर्यंत – महानगर नियोजनकार.
3) 1000 चौ. मी. ते पुढील सर्व भूखंड – महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी PMRDA.

या सुधारित आदेशानुसार आता बांधकाम परवानगीबाबतचे कामकाज, दि. 15/12/2022 पासून सुरू करण्यात आलेले आहे. तसेच बांधकाम परवानगी विभागामध्ये कामकाजासाठी प्राधिकरणाच्या दूर-दूरच्या भागामधून नागरिक तसेच संबंधित वास्तुविशारद येत असल्यामुळे, भेटण्याची वेळ ही दुपारी 12.00 ते सायंकाळी 5.00 करण्यात यावी, अशी सूचना महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेली असून त्याप्रमाणे अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याची माहिती, राहुल महिवाल, महानगर आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) पुणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलीय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *