माझा राजीनामा घ्यायला मी काय मंत्री आहे का? – सुषमा अंधारे

२८ डिसेंबर २०२२


मनसेकडून सुषमा अंधारे यांचा राजीनामा मागितला जात आहे. त्यावरून सुषमा अंधारे यांनी मनसेवर टीका केली. सरकारमधील नेतेच शिवाजी महाराजांचा अवमान करत आहेत. या नेत्यांचा मनसे राजीनामा का मागत नाही? पण मनसे म्हणते की, सुषमा अंधारे यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अरे माझा राजीनामा घ्यायला मी काय मंत्री आहे का?, असा संतप्त सवाल त्यांनी केला. यावेळी त्यानी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

महापुरुषांबद्द्ल हे लोक जाणीवपूर्वक स्टेटमेंट करतात. आपले लक्ष विचलीत करण्यासाठी सातत्याने बोलतात. मूळ मुद्द्यांपासून जनतेचं लक्ष इतर ठिकाणी वळवण्यासाठी ते असं करत आहेत, असा आरोप त्यांनी केला .यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकातील ज्ञानदेवांवर केलेले टीकात्मक लेखन दाखवत प्रश्न उपस्थित केला. जर सावरकरांनी ज्ञानेश्वरांवर टीकात्मक लेखन केले तर मग सावरकरांवर टीका करणार का? श्री श्री रविशंकर आणि इंदूरीकर महाराज यांतुमच्यात हिंमत असेल तर आंबेडकर आणि फुले खोट बोलत होते हे समोर येवून सांगा. देवेंद्रजी तुम्हाला काय वाटले, तुम्ही वार कराल आणि मी पळून जाईल असे वाटले का? मी चळवळीतील कार्यकर्ती आहे, असं त्या म्हणाल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *