कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे खोटं ट्विट करणाऱ्याची माहिती मिळाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१९ डिसेंबर २०२२


बेळगावमध्ये सीमावाद पेटलेला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या नावे बनावट ट्वीट केले जात असल्याचा दावा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह झालेल्या बैठकीत बोम्मई यांनी हा दावा केला होता. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना हे ट्वीट करणाऱ्याची माहिती मिळाली असल्याचं सांगितलं आहे.

आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समोरामसोर चर्चेदरम्यान तुम्ही ट्वीट करत असून हे चुकीचं आहे असं सांगितलं. त्यावर त्यांनी हे आमचं ट्वीट नाही सांगत नकार दिला. हे ट्वीट ज्यांनी केलं आहे त्यांचीही माहिती त्यांना मिळाली आहे. या ट्वीटमागे कोणता पक्ष आहे याचीही माहिती मिळेल, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *