पिंपरी-चिंचवडमध्ये बालरोगतज्ज्ञ समिती तात्काळ नियुक्त करा!..भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांची मागणी….शहरातील मधुमेही रुग्णांना लसीकरणात प्राधान्य देण्याबाबत प्रशासनाला सूचना

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि १७ मे २०२१
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लहान मुलांमधील कोविडच्या लक्षणांचा अभ्यास करुन त्यावर मात करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची नियोजन समिती लवकरात लवकर तयार करावी, अशीही आग्रही मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष तथा माजी शहर उपाध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाने बालरोग तज्ज्ञांच्या समितीमध्ये पिंपरी-चिंचवडमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश करावा. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच प्राथमिक लक्षणे, उपचार आणि इन्फ्रास्ट्रक्चर पद्धतीबाबत अभ्यास करण्याची जबाबदारी संबंधित समितीकडे सोपवण्यात यावी. तसेच, या समितीच्या तज्ज्ञांनी बालरोग डॉक्टरांना प्रशिक्षण द्यावे. पिंपरी-चिंचवडमध्ये किती बालरोग्य तज्ज्ञ आणि लहान मुलांची रुग्णालये उपलब्ध आहेत. त्यामध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधा आणि कमतरता याचा अभ्यास करण्यात यावा. लहान मुलांसाठी आरोग्य मार्गदर्शनपर हेल्पलाईनही सुरू करण्यात यावी. यापुढील काळात समितीच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधक उपायोजनांवर नियंत्रण ठेवण्याची भूमिका समितीने घ्यावी. याबाबत योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षीत आहे, असेही मोढवे-पाटील यांनी म्हटले आहे.


मधुमेही रुणांना लसीकरणात प्राधान्य हवे…

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना कोरोना विषाणुच्या दुस-या लाटेचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ज्यांनी कोरोना विषाणुवर यशस्वीपणे मात केली त्यातील काहींना आता म्युकरमायकोसिस आजाराचा त्रास होऊ लागला आहे. विशेषतः मधुमेह असलेल्या नागरिकांमध्ये या अजाराची लक्षणे वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने मधुमेह असलेल्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्याबाबत विचार केला पाहिजे. मधुमहे असलेल्या नागरिकांना वेळोवेळी शूगर चेक करावी लागते. शूगर लेव्हल स्थिर ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडे उपचार घ्यावे लागतात. ते उपचार घेत असलेल्या डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन अशा रुग्णांना प्राथमिक स्तरावर कोविड प्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. लस दिल्यानंतर म्युकरमायकोसिस विषाणुचा प्रतिकार करण्यासाठी त्यांच्या शरिरामध्ये प्रतिकार शक्ती तयार होईल. त्यांना होणारा धोका टळेल, अशी मागणी दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.