स्थायी समिती सभापतींवरील कारवाईसदर्भात सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करणार – पिंपरी-चिंचवड भाजपा प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांची माहिती…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २१ ऑगस्ट २०२१
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून झालेल्या कारवाई संदर्भात शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सविस्तर माहिती घेवून संबंधित अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवणार आहे, अशी माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती दालनात बुधवारी लाच लुचपत विभागाने कारवाई केली. त्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपावर झालेल्या आरोप प्रकरणी माहिती घेवून अहवाल सादर करण्याची जबाबदारी पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपवली होती.
आमदार मिसाळ यांनी शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी भेट घेवून चर्चा केली. यावेळी माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याशी आमदार मिसाळ यांनी दूरध्वनीवर संपर्क साधला. तसेच, महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेवून माहिती घेतली. सर्व आढावा घेवून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अहवाल पाठवणार असून, त्यावर योग्य ती भूमिका प्रदेशाध्यक्ष मांडतील, असेही आमदार मिसाळ यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *