शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना अडचणीत आणण्याचे फडणवीसांचे षडयंत्र – सुषमा अंधारे

२८ डिसेंबर २०२२


विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर विधान परिषदेत प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळामुळे सभागृहाच्या सभापतींना अधिवेशन तहकूब करावं लागलं. यानंतर सुषमा अंधारे यांनी फडणवीसांच्या विधानावर उत्तर दिले आहे.

सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचा उल्लेख करत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, मूळ चर्चा काय आहे? तर ८३ कोटींचा भूखंड दोन कोटीला कसा विकला गेला? हा प्रश्न भाजपच्या आमदारांनी का तारांकीत म्हणून नोंदवला? आज सभागृहात तब्बल चार मंत्र्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. त्यामुळे तब्बल चार मंत्री अडचणीत आले आहेत. हे चारही मंत्री शिंदे गटातील आहे. भाजप पद्धतशीरपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे मंत्र्यांनाही अडचणीत आणत आहे. असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दहा-पंधरा दिवसांपूर्वी म्हणाले होते की आम्हाला फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून बसवायचं आहे. ते पद्धतशीरपणे कारस्थान पुन्हा एकदा पूर्णत्वास नेलं जात आहे. इकडे चर्चेची राळ उडवाची आणि तिकडे षडयंत्र आखायचं ही देवेंद्र फडणवीस यांची नीती कौतुकास्पद आहे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *