१ वर्ष १ महिना आणि २६ दिवसांनी अनिल देशमुखांची सुटका

२८ डिसेंबर २०२२


माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं देशमुखांच्या जामीनाला दिलेली वाढीव स्थगिती संपली आहे. याचसंदर्भात सीबीआयनं जामीनाला मुदतवाढ मिळण्यासाठी केलेल्या याचिकेसंदर्भात काल हायकोर्टात तातडीची सुनावणी पार पडली. त्यांच्या जामीनाच्या स्थगितीला मुदत वाढवून देण्याच्या सीबीआयची मागणी कोर्टानं फेटाळली आहे.

१०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज १ वर्ष १ महिना अन् २६ दिवसांनी सुटका होणार आहे.देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुख बाहेर आल्यानंतर आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *