बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरी यांच्यावतीने जांभोरीमध्ये शहीद दिन साजरा…

जांभोरी : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी

जांभोरी ता.आंबेगाव येथे जननायक बिरसा मुंडा यांचा शहीद दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी प्रतिमेचे पुजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.
आदिवासी बांधवांसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे महान  क्रांतीकारक बिरसा मुंडा यांचा झारखंड रांची या गावी जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. मुत्यु 9 जुन 1900 रोजी झाला. माननिय बिरसा मुंडा राघोजी भांगरे ,लायन हारटेड होनाजी भागू केंगले या आद्यक्रांतिकारक यांनी इंग्रजी सावकारशाई विरुद्ध बंड पुकारला होता.

Advertise

उलगुलान या बंडाच नाव होतं जांभोरी हि आद्यक्रांतिकरक होनाजी केंगले यांची जन्मभूमी आहे. होनाजी केंगले यांनी हत्तीचंद गुप्तचंद व्याज देणाऱ्या सावकारांचे नाके कापली होती. क्रांतिकारक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे ,होनाजी केंगले यांनी जल जंगल जमीन यासाठी आंदोलन केले. होते अशा महान क्रांतीकारक यांच्या पराक्रमी आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन करण्यात आले.

     या वेळी जांभोरी गावचे माजी सरपंच मारुती केंगले, शामराव बांबळे ,आदिवासी समाजाचे युवानेते मारुती दादा केंगले, बिरसा ब्रिगेड शाखा जांभोरीचे अध्यक्ष सुनिल गिरंगे, भिमा केंगले विकास पोटे ,दिगंबर केंगले अक्षय हिले ,नितीन गिरंगे पोलीस पाटील नवनाथ केंगले अक्षय हिले ,आकाश केंगले बाळासाहेब मते ,प्रकाश केंगले, मानाजी केंगले जांभोरी गावचे ग्रामस्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *