नागरिकांच्या सेवेस सदैव तत्पर नेहरूनगरचे नगरसेवक राहुल भोसले…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी :-दि २९ मार्च २०२१
नेहरूनगर पिंपरी येथील नेहरूनगर संतोषी माता चौक, सिग्नलजवळ, बस स्टाॅप काही दिवसांपूर्वी संपूर्ण जळून खाक झाला होता. बस स्टॉप जळालेल्या व तुटलेल्या अवस्थेत असल्याने नागरीकांची गैरसोय होत होती. प्रवाश्यांना भर उन्हात रस्त्यावर उभे रहावे लागत होते. नागरीकांची होणारी गैरसोय नगरसेवक राहुलभाऊ भोसले यांच्या लक्षात आल्याने , तत्परतेने राहुलभाऊ भोसले यांनी त्वरीत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी राहुल भोसले यांनी स्वःखर्चाने बस स्टॉप ची नव्याने उभारणी करून मानवतेचे दर्शन घडवून दिले.
त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक व आभार मानले. त्यांच्यासारखेच नागरिकांची अशी काळीजी शहरभरातील नगरसेवकांनी घ्यावी असेही काही नागरिकांनी आपला आवाजशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *