चेक किती बाऊन्स झाले पालिकेला माहीतच नाही

२७ डिसेंबर २०२२

पिंपरी


महापालिकेच्या करसंकलन विभागाची मिळकतकर वसुलीची मोहीम जोरात सुरु आहे. करसंकलन महापालिका विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० कोटी रुपयांच्या मिळकतकर वसुलीचा टप्पा पूर्ण केला आहे मात्र , चेकने पेमेंट केलेल्या रहिवाशांच्या चेक बाउन्स तब्बल झाल्याचा आकडाच महापालिकेला माहिती नाही.

महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून शहरातील १७ विभागीय कार्यालयांअंतर्गत करवसुली करण्यात येत आहे . रोख , चेक , डीडी तसेच ऑनलाइन पद्धतीने वसुली करण्यात येत आहे . त्यात वर्षभरात १८ हजार ७० चेक पेमेंटद्वारे ९ ३ कोटी ८० लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे . मात्र , त्यात चेक किती बाउन्स झाले याचा आकडाच प्रशासनाकडे नसल्याची माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली . गेल्या पाच वर्षांत किती चेक जमा व बाउन्स झाले याचीही माहिती महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे सहायक आयुक्त देशमुख यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *