डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन
दि.०९/०१/२०२३
मुंबई
मुंबई : ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे आज सोमवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. ते वृत्तनिवेदक, लेखक तसेच अभिनेते होते. त्यांनी अठराहून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात पुण्यातून केली. तसेच त्यांनी पुणे आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये नोकरीही केली होती. त्यानंतर त्यांची वृत्तनिवेदक म्हणून कारकीर्द सुरू झाली. ते पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे खातेप्रमुख होते. ‘सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन’चे ते संस्थापक होते.