काय झाडी…..काय डोंगार वाले आमदार शहाजीबापू बालबाल बचावले

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०७ जुलै २०२२

मुंबई


‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल एकदम ओक्केमध्ये आहे समंद’, या एका डॉयलॉगमुळे एका रात्रीत देशात प्रसिद्ध झालेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर मुंबईत एक मोठे संकट कोसळले होते. मात्र, त्यातून ते थोडक्यात बचावले. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील आमदार पाटील यांच्या रूमच्या छताचा काही भाग कोसळला. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली.

रूममधील बेडवर सिलिंगचा मोठा भाग कोसळला आहे. यातून पाटील थोडक्यात बचावले आहेत. यावर पाटील यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. ते सुरक्षित आणि सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. गुवाहटीमध्ये निसर्गरम्य अलीशान हॉटेलमध्ये काही दिवस घालविल्यानंतर गोवामार्गे मुंबईतील आमदार निवासात आल्यावर त्यांना या प्रसंगाला सामोरे जावे लागले.त्यातून ते वाचले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *