शिवनेरी किल्ल्यावर प्रथमच सापडले दगडी तोफगोळे…गडाच्या ऐतिहासिक वारसेत मोठी उपलब्धी

जुन्नर प्रतिनीधी

वनपरीक्षेत्र जुन्नर मधील वनरक्षक रमेश खरमाळे व नारायण राठोड यांना शिवनेरी किल्ल्यावर पूर्वेस असलेल्या साखळदंड मार्गाच्या बुरजा शेजारी साडे “चार किलो ग्रॅम वजनाचे व ४५ से.मी व्यासाचे तीन गोल दगडी गोळे” जमीनीत अर्धवट गाडलेल्या अवस्थेत आढळून आले.

रमेश खरमाळे यांनी ते मातीतून बाहेर काढल्यावर हे तोफगोळे असावेत का…? याच्या खात्रीसाठी इतिहास अभ्यासक विनायक खोत यांच्याशी संपर्क साधला असता ते तोफगोळेच असल्याचे निश्चित झाले,शिवनेरीच्या ऐतिहासिक वारसेत ही खूप मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले.

शिवनेरी सारख्या महत्वाच्या गडावर आज तोफा आढळून येत नाही,पण गडावर तोफगोळे सापडल्याने येणाऱ्या पुढील काळात योग्य ठिकाणी उत्तखणन करून शोध घेतल्यास निश्चितच तोफा सापडतील असे मत ही इतिहास अभ्यासक विनायक खोत यांनी व्यक्त केले.

शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांना पाहण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या वस्तू संग्रहालयात या तोफगोळ्यांची नक्कीच भर पडनार आहे…