पूर्वाताई दिलीपराव वळसे पाटील यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह…

प्रकृती स्थिर असुन, संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी.नियमांचे पालन करावे सोशल मिडियाच्या माध्यमातुन दिला संदेश

मोसीन काठेवाडी
आपला आवाज
आंबेगाव ब्युरोचिफ

महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री , आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांची कन्या अँड पूर्वाताईं वळसे पाटील यांची आज कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आली असून प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सूरु असल्याची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी सांगितली
कोरोना सदृश्य लक्षण दिसत असल्याने टेस्ट केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

सध्य स्थितीला प्रकृती असून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरु असून राष्ट्रवादी भवन , मुंबई व इतर कार्यक्रमाप्रसंगी संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी असे अवाहन त्यांनी केले आहे व लक्षणे आढळून आल्यास टेस्ट करून घ्यावी व गर्दीची ठिकाणे टाळावीत काटेकोर पणे शासकीय नियमांचे पालन सर्वांनी करावे असे त्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *