माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना मोठा दिलासा; उद्याच तुरुंगाबाहेर येणार

२७ डिसेंबर २०२२


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सीबीआयची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे देशमुख उद्या तुरुंगाबाहेर येणार आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआय़च्या मागणीनंतर देशमुखांच्या जामिनाला १० दिवसांची स्थिगिती देण्यात आली होती. त्यानंतर आज याप्रकरणी  न्यायालयात सुनावणी झाली.

देशमुख यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी सीबीआयने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *