बॉम्ब बॉम्ब म्हणणारे लवंगी फटाकाही नाही, फडणवीसांचा ठाकरे गटाला टोला

२७ डिसेंबर २०२२

नागपुर


नागपुरात रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात जाऊन देवेंद्र फडणवीसांनी आज डॉ.हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपुरला जाऊन बॉम्ब फोडणार असल्याचे म्हटले होते. यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या. तसेच बॉम्ब बरेच आहेत. वाती काढल्या आहेत. फक्त त्या वाती पेटवण्याचा अवकाश आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शूट अॅण्ड स्कूटचा प्रकार राज्यात सुरू आहे. कोणतंही कारण काढायचं, आरोप करायचे, पण उत्तरे घ्यायची नाहीत, अशी परिस्थिती राज्यात आहे. बॉम्ब बॉम्ब म्हणणारे लवंगी फटाकाही नाही, असे म्हणत त्यांनी प्रतिउत्तर दिले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *