श्रीमती एस.आर.केदारी बालक मंदिर मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी
२७ डिसेंबर २०२२

ओझर


विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांचे दर्शन घडवण्यासाठी त्याचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे शाळेचे गॅदरिंग. श्रीमती एस. आर. केदारी बालक मंदिर नारायणगाव या शाळेत शनिवार दि. २४/१२/२०२२ व रविवार दि.२५/१२/२०२२ रोजी इयत्ता पहिली ते चौथीचे विविध गुणदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर ठेका धरत आपल्या नृत्य कलेचे दर्शन घडवले. तसेच एकपात्री प्रयोगातून त्यांनी आपल्यातील नाट्य कलेचा ठसा उमटवला. संगीत शिक्षक दुधवडे सर यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी सुरेल गाणी व भक्तीगीत सादर केले व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

शाळेतील कार्यानुभव शिक्षिका सौ.भालेराव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी लता मंगेशकर यांच्या विविध गाण्यांवर नृत्य सादर करत त्यांना आदरांजली वाहिली. शाळेच्या या वार्षिक स्नेहसंमेलनास ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त मा. श्रीमती नंदाताई डांगे मॅडम ,मा. डॉ. श्रीकांत विद्वांस सर,ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा. प्रकाश मामा पाटे, ग्रामोन्नती मंडळाचे उपाध्यक्ष मा .सुजित खैरे सर, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न, कृषिभूषण मा. अनिल तात्या मेहेर सर, ग्रामोन्नती मंडळाचे उपकार्याध्यक्ष मा. आनंद कुलकर्णी सर ,ग्रामोन्नती मंडळाचे कार्यवाह मा.  रवींद्र पारगावकर सर, ग्रामोन्नती मंडळाचे सहकार्यवाह व बालक मंदिरचे चेअरमन मा.अरविंदभाऊ मेहेर सर,ग्रामोन्नती मंडळाचे संचालक सदस्य मा. शशिकांत वाजगे सर, ग्रामोन्नती मंडळाचे संचालक सदस्य मा. रमेश जुन्नरकर सर , ग्रामोन्नती मंडळाचे संचालक सदस्य मा .भरवीरकर सर,बालक मंदिर समितीच्या सदस्या मा. सौ.मोनिकाताई मेहेर मॅडम, बालक मंदिर समितीचे सदस्य मा. देविदास भुजबळ सर, मा. सौ .अंजली पारगावकर मॅडम,गटशिक्षण अधिकारी मा .सौ. अनिता शिंदे मॅडम, मा. सौ .भरवीरकर मॅडम, मा.  शशिकांत अभंग सर व मा. सौ. जयश्रीताई अभंग, निसर्गप्रेमी मा. सुधाकर लोंढे सर, जर्मन पाहुण्या प्रेटा स्टेमख , फोटोग्राफर मा. निरंजन जोगळेकर सर, आपला आवाज या युट्युब चॅनलचे वार्ताहर मा. मंगेश शेळके सर, समाज दर्पण या न्यूज चॅनलचे संपादक मा.सचिन डेरे सर, मुख्याध्यापिका व माजी शिक्षिका ,शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता पारखे मॅडम, शाळेच्या उपमुख्याध्यापिका मा. सौ. अरुणा कानडे मॅडम उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. सुनिता पारखे मॅडम यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सौ. योगिता आजाब मॅडम व सौ. आशा भुजबळ मॅडम यांनी केले व उपस्थितांचे आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *