ओझर येथे दक्षता सेवा फाऊंडेशनच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

दि. २७./१२/२०२२
ओझर


ओझर : पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या ओझर येथील दक्षता सेवा फाउंडेशन या संस्थेची बैठक ओझर २ येथील महालक्ष्मी सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी सर्व पदाधिकाऱ्याना नियुक्तीपत्रे आणि ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
या बैठकीस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय भावसार, सचिव किरण देशपांडे, संचालक संतोष ठाकरे, पुणे जिल्हाध्यक्ष सुभाष लोहार, पुणे जिल्हा महिलाध्यक्ष विमल काजळे, जुन्नर तालुकाध्यक्ष रायचंद शिंदे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
संस्थापक अध्यक्ष संजय भावसार यांनी आपल्या भाषणात पोलिस अधिकारी,पोलीस कर्मचाऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी तसेच समाजात त्यांची समाजात प्रतिष्ठा उंचावण्यासाठी काम करावे असे आवाहन केले. तसेच संस्थेमार्फत पोलिसांच्या कुटुंबासाठी आरोग्य शिबीर, योग शिबिरासह ज्या शैक्षणिक आणि आरोग्य विषयक सुविधा पुरविल्या जाणारा आहेत त्यांची माहिती दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *