राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिवजन्मस्थळी नतमस्तक…

दोन दशकात पहिल्यांदाच राज्यपाल किल्ले शिवनेरीच्या भेटीला

अतुलसिंह परदेशी (मुख्य संपादक)

जुन्नर…
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवार दि.16 ऑगस्ट रोजी शिवजन्मस्थळ किल्ले शिवनेरी ची पाहणी केली…

किल्ले शिवनेरी वरील आई शिवाई मंदिर याठिकाणी राज्यपाल यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी आमदार अतुल बेनके उपस्थित होते…
किल्ले शिवनेरी परिसराची संपूर्ण माहिती देण्यासाठी शिवाजी ट्रेल चे विनायक खोत यांनाही आमंत्रित करण्यात आले होते…

गेल्या दोन दशकांत प्रथमच राज्याचे राज्यपाल किल्ले शिवनेरीच्या भेटीला आल्याने शिवप्रेमीणी आनंद व्यक्त केला.
आई शिवाई देवीची आरती केल्या नंतर आई जिजाऊ व बाल शिवाजी यांच्या पुतळ्याला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. यावेळी राज्यपाल स्वराज्य निर्माते आणि राज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक झाले.
सकाळी साडेदहा वाजल्यापासून किल्ले शिवनेरीवरील पहिल्या दरवाजापासून ते संपुर्ण गडावर पायी फिरून राज्यपाल यांनी गडाची पाहणी केली.

राज्यपालांच्या किल्ले शिवनेरीवरील भेटीच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियोजनाची तयारी करण्यात आली होती.पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा ही सज्ज होती.
पावसाचे वातावरण असल्याने गडावरील राज्यपालांच्या भेटीच्या दृष्टीने विशेष खबरदारी प्रशासन घेतली होती.
गेल्या २० वर्षांत राज्यपालांच्या किल्ले शिवनेरी भेटीची ही पहीलीच वेळ असल्याने या भेटीला विशेष महत्व आहे.