नारायणगाव येथे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांनीही केली नागरिकांची तपासणी

नारायणगाव (किरण वाजगे)
नारायणगाव येथे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आयुष प्रसाद यांनी देखील नागरिकांची तपासणी केली, यावेळी इतर प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

आज मंगळवार दि. ८ रोजी पुणे जिल्हा परिषद, पुणे जिल्हा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जीवघेण्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नारायणगावमध्ये घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक सदस्यांची आॅक्सिजन लेवल, पल्स, थर्मल स्क्रिनींग करण्यात आली.

यासाठी नारायणगावमधील नागरिकांनी सहकार्य केले. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच गणेश मित्र मंडळ, बचत गटातील महिला सर्वांनी या कार्यासाठी सहकार्य केले.

आज झालेल्या तपासणीनंतर सर्वांनीच स्वतःची व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे, प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आयुष प्रसाद यांनी केले.

या वेळी तहसीलदार हनुमंत कोळेकर, जि प सदस्या आशाताई बुचके, विघ्नहर साखर कारखाना चे संचालक संतोष नाना खैरे, डॉ वर्षा गुंजाळ, डॉ चैताली कांगुणे, आरोग्य विभागाचे कर्मचारी, उपसरपंच सारिका डेरे, ग्राम विकास अधिकारी नितीन नाईकरे , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी, ग्रा प सदस्य अरिफ आतार, भागेश्वर डेरे , संतोष दांगट आदी मान्यवर उपस्थित होते.

या मोहिमेमध्ये प्रफुल्ल वऱ्हाडी, कृष्णा डेरे, समीर औटी, संदीप गांधी, विकी खेबडे, विकास तांबे, निखिल दरांदळे, संदेश औटी,अक्षय डेरे, राहुल लोखंडे, हुसेन शिंदे, अमोल लोखंडे, बाळासाहेब मुंढे, किरण तांबे, दीपक डेरे, विजय शेळके आदींनी नागरिकांच्या तपासणी कामी आरोग्य कर्मचा-यांना सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *