ताजे येथील खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना जन्मठेप

दि. २७./१२/२०२२
पिंपरी


पिंपरी : सुमारे पाच वर्षांपूर्वी कामशेत पोलिसठाण्याच्या हद्दीतील ताजे येथे एका व्यक्तीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. या प्रकरणी वडगाव न्य्यायालयात खटला चालू होता. त्याचा निकाल नुकताच लागला असून न्यायालयाने या गुन्ह्यासाठी तिघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

रघुनाथ चंदू वाल्हेकर वय ५५ वर्षे, कैलास उर्फ काळू रघुनाथ वाल्हेकर वय ३२ वर्षे, विठ्ठल रघुनाथ वाल्हेकर वय ३० वर्षे सर्व राहणार सावंतवाडी, महागांव ता. मावळ जि. पुणे अशी शिक्षा झालेल्यांची नवे आहेत. तिन्ही आरोपीना दोषी धरून त्यांना भादवि कलम ३०२, ३४ मध्ये जन्मठेप व प्रत्येकी ५००० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद व भादवि कलम २०१ मध्ये प्रत्येकी १००० रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

ताजे येथे दिनांक १०/१२/२०१७ रोजी रेल्वेमार्गाजवळ हरिच्छंद्र पांडुरंग वाघमारे यांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. कामशेत पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल होता.तत्कालीन पोलीस निरीक्षक, आय. एस. पाटील, यांनी सदर गुन्हयाचा तपास हाती घेतला. व कामशेत पोलीस स्टाफच्या मदतीने या गुन्हयाचा कसोशीने तपास करून गुन्हा उडकीस आणला. अजय दरेकर, सहायक फौजदार यांनी गुन्ह्याचा तपास केला. व केस अधिकारी संजय जगताप पोलीस निरीक्षक कामशेत पोलीस स्टेशन, कोर्ट अमलदार पोलीस हवालदार संदिप शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल खाडे कामशेत पोलीस स्टेशन, जिल्हा पैरवी अधिकारी अर्जुन घोडे पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार मनोज लोखंडे यांनी केसमध्ये सुनावणी वेळी मदत केली.सरकारी वकील सुनील मोरे यांनी कोर्टात सरकारतर्फे बाजू मांडून आरोपींना शिक्षा होण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *