कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली; अजित पवारांचा अब्दुल सत्तारांवर आरोप

२६ डिसेंबर २०२२

नागपूर


राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनादरम्यान आक्रमक होतांना पाहायला मिळाले. तर सिल्लोड येथील कृषी महोत्सवारून अजित पवार यांनी सत्तार यांच्यावर आरोप केले आहेत.

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या ‘सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. यासाठी तिकीट छापण्यात आले असून, त्यासाठी काही दरही ठरवण्यात आले आहे. ज्या जिल्ह्यात १० पेक्षा अधिक तालुके आहेत त्या ठिकाणी प्लॅटिनम प्रवेशिका देण्यात आली असून, त्यासाठी २५ हजार रुपये दर ठरवण्यात आला आहे. तर इतर प्रवेशिकांचे पाच हजार, साडेसात हजार आणि दहा हजार दर ठरवण्यात आले असून, याचे माझाकडे पुरावे असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *