पुणे येथील शिक्षण परिषदेमध्ये 30 ठराव मंजूर

पुणे प्रतिनिधी 

दि.10/10/2022


महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थी , शिक्षक व एकूण शिक्षण क्षेत्राशी संबंधित 30 ठराव पारित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने शिक्षण परिषद व आदर्श शिक्षक सन्मान सोहळा पुणे येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कूलचे नाट्यसम्राट विजय तेंडुलकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता या शिक्षण परिषदेचे उद्घघाटन राज्याचे माजी गृह व ग्रामविकास राज्यमंत्री आमदार सतेज पाटील सतेज उर्फ बंटी डी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .या परिषदेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे होते. या परिषदेमध्ये बोलताना माजी मंत्री आमदार सतेज पाटील म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यासपूर्वक आढावा घेऊन शाळाबाह्य मुलांना शाळेमध्ये आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत प्राथमिक शाळांमध्ये 96% दाखल प्रमाण असले तरी ते शंभर टक्के वर आणण्यासाठी झटले पाहिजे महाविद्यालयामध्ये पन्नास टक्केक मुलेच दाखल होतात,हे प्रमाण वाढवले पाहिजे .प्राथमिक शिक्षक हा विद्यार्थ्यांचा आई-वडिलाप्रमाणेच अतिशय प्रिय असा गुरु असतो त्यांचे संस्कार देशाचे भावी नागरिक घडवण्यासाठी उपयोगी पडत असतात .सर्व शिक्षक हे समर्पित वृत्तीने काम करीत असतात अशा तील निवडक शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे त्यांचे मी अभिनंदन करतो व या संघटनेने ही शिक्षण परिषद भरवून शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक उपक्रम राबविल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो .

या परिषदेमध्ये वीस पटाखालील शाळा बंद करू नयेत, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षक भरती त्वरित करावी , प्रचलित दराने विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना वेतन द्यावे . अभ्यासक्रम किंवा शैक्षणिक धोरण ठरवताना संघटनांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, संस्थांचे घरफळा पाणी व वीज बिल घरगुती दराने आकारावे, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सरसकट वरिष्ठ व निवड श्रेणी द्यावी, शिक्षकांना कॅशलेस मेडिकल योजना मंजूर करावी, शिक्षकां अशैक्षणिक कामे लावू नयेत खाजगी शाळातील शिक्षकांचा, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी विचार करावा,नपा / मनपा शाळांतील खाजगी शिक्षकांना १०० टक्के मेडिकल बील राज्य शासनाने द्यावे, संयमान्यतेसाठी आधार कार्ड सक्ती रद्द करावी, अशैक्षणिक कामे देऊ नयेत, शिक्षकांना कॅशलेसमेडिकल योजना लागू करावी,अशा प्रकारचे 30 ठराव या परिषदेमध्ये संमत करण्यात आले या परिषदेमध्ये शिक्षण तज्ञ अनिल गुंजाळ, जयवंत हक्के, अदिती केळकर ,सारंग पाटील .बादशहा जमादार, महादेव डावरे ,अर्जुन रसाळ ,छोटू मासाळ, शालीनी बोरसे, कैलास शिंदे ,संगीता चौधरी यांनी आपले भूमिका मांडली .अध्यक्षपदावरून बोलताना भरत रसाळे यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांचा आढावा घेऊन शिक्षक हा त्याग आणि समर्पणाची भावना घेऊन काम करीत असतो शासनाने शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत व आपली शिक्षणाप्रती अनास्था आहे ती कमी करावी असे आवाहन केले प्रास्ताविक सारंग पाटील यांनी तर स्वागत संतोष शिळमकर यांनी केले आभार शिवाजीराव माने यांनी मांडले सूत्रसंचालन ननवरे यांनी केले

ही परिषद यशस्वी करण्यासाठी पुण्याचे पदाधिकारी जी.डी. मोराळे,धीरज गायकवाड,अर्चना मोरे, शिवाजीराव माने,विश्वास कोचळे, निलेश डोंगरे, पिंपरी चिंचवड विभाग प्रमुख श्रीकांत राहणे ,विजय राठोड, संतोष तनपुरे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी अतिशय परिश्रम घेतले .या परिषदेसाठी महासचिव अंजन पाटील (धुळे ) राज्य मुख्याध्यापक अध्यक्ष जयवंत हक्के ( सोलापूर )राज्य संघटक बादशाह जमादार ( जयसिंगपूर ) मराठवाडा विभागप्रमुख संतोष पाटील डोणगावकर (औरंगाबाद ) राज्यसचिव शिवाजी भोसले पतसंस्थेचे चेअरमन महादेव डावरे (कोल्हापूर ) महिला आघाडी प्रमुख अतिथी केळकर, नंदिनी पाटील राज्य शिक्षकेतर प्रमुख महेश पवार ( नाशिक )विद्युतता बोकील (अहमदनगर ) शशिकांत माळी, अशोक शिंदे (सांगली )कोकण विभाग प्रमुख महेंद्र कापडी (रत्नागिरी ) हे उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *