निगडी स्मशानभूमीसाठी विविध विकास कामांचा उत्तम केंदळे यांचा पाठपुरावा…निगडी स्मशानभूमीतील विद्युत दाहीनी व स्थापत्य विकास कामे करण्यास आयुक्तांकडे नगरसेवक उत्तम केंदळे यांचा पाठपुरावा…

रोहित खर्गे
विभागीय संपादक
पिंपरी- दि १७ मे २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील निगडी स्मशानभूमीत
येथे मागील दोन वर्षांपूर्वी एक नवीन विद्युत दाहिनी बसवण्यात आलेली आहे निगडी स्मशान भूमी अंतर्गत निगडी, यमुनानगर,मोरेवस्ती,आकुर्डी,तळवडे, त्रिवेणीनगर, रुपीनगर,कृष्णानगर संभाजीनगर,प्राधिकरण आदि भागातून नागरिक अंत्यविधीसाठी स्मशानभूमी मध्ये ये जा करत असतात जास्त लोकसंख्या असल्याने या भागातील मृत्यू दरही त्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी अजून विद्युत दाहिनी 17 वर्षा मागील आहे ती काढून टाकून त्या ठिकाणी नवीन विद्युत दाहिनी बसून देण्यात यावी तसेच नवीन विद्युत दाहिनी बसविण्याचा पाठपुरावा व पत्र आयुक्त यांना चालू आहे त्या अनुषंगाने या वर्षीच्या अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद उपलब्ध केली आहे त्यासंदर्भातील सर्वसाधारण सभेमध्ये 30 एप्रिल 2021 रोजी ठराव सुद्धा करण्यात आलेला आहे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्मशानभुमी वर आलेला ताण, वाढती लोकसंख्या तसेच शहराचे होत असलेले नागरिकरण यामुळे व शासनाच्या आदेशाने निगडी अमरधाम स्मशानभुमी मध्ये नव्याने अजुन दोन गॅसदाहिनी व विद्युत दाहिनी बसवण्याचे काम लवकरच होणार आहे त्यासाठी लागणारी योग्य जागा उपलब्ध आहे
त्याच प्रमाणे मागील अनेक वर्षांपासून निगडी स्मशानभूमी नागरिकांसाठी केंद्रस्थानी ठरलले आहे दर वर्षीच्या अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद स्मशानभूमी साठी करण्यात येत होती त्यामुळे कायम सुविधांची कमतरता जाणवली जात आहे
स्मशानभूमी मधील कामांचा कायमचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी दोन कोटींची तरतूद उपलब्ध करून देण्याचा पाठपुरावा सुद्धा केला आहे अनेक स्थापत्य विकास कामे, शौचालय,प्रतीक्षा शेड,हवा प्रदूषण नियंत्रण संच,सीमाभिंत, सुरक्षा रक्षक खोली इ कामे व विद्युतविषयक कामे करणे गरजेचे आहे त्यानुसार लागणारा पाठपुरावा सुद्धा काही महिन्यापासून चालू आहे लवकरच ही सर्व कामे पूर्ण होतील असे केंदळे यांनी सांगितले .