भाजप, शिंदे गटाकडून बदनामी सुरू असल्याने आदित्य ठाकरे न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत

२६ डिसेंबर २०२२

मुंबई


दिशा सालियन मृत्यूप्रकरणाशी संबंध जोडून भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांकडून सातत्याने बदनामी केली जात असल्याने या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याचा विचार शिवसेना नेते आदित्य ठाकरे करीत असल्याचे वृत्त आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन मृत्युप्रकरणी आरोप केले आहेत. त्यांच्या ‘नार्को’ चाचणीची मागणी केली आहे. शेवाळे यांनी रिया चक्रवर्तीला ‘एयू’ नावाने आलेले अनेक दूरध्वनी आदित्य ठाकरे यांचे होते, असे आरोप केले होते. यासंदर्भात अब्रुनुकसानीबद्दल न्यायालयात जाण्याचा विचार आदित्य ठाकरे करीत आहेत. या संदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याचे काम सुरू असल्याचे समजते.

दरम्यान दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी विशेष पथक स्थापून करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *