पोलीस भरतीसाठी स्टेरॉईड घेण्याचा विचार चुकूनही करू नका

२६ डिसेंबर २०२२

पिंपरी


अंगी जोश येण्यासाठी काही तरुणांनी ‘ स्टेरॉईड ‘ घेतल्याची माहिती ‘ अग्निवीर ‘ भरतीमध्ये समोर आली. असाच काही प्रकार आता महाराष्ट्र पोलिस भरतीमध्ये होतोय की काय,अशी भीती व्यक्त होत आहे . पण तुम्हीही महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी शारीरिक परीक्षा देणार असाल तर स्टेरॉईड घेण्याचा विचार चुकूनही करू नका. यामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते , असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. सामान्यतः खेळाडू किंवा धावपटू स्वतःची एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी किंवा अतिरिक्त एनर्जीसाठी स्टेरॉईड घेतात. तसेच काही रोगांवरही स्टेरॉईड उपयोगी आहे . मात्र , खेळांमध्ये स्टेरॉईड घेणे हा दंडनीय गुन्हा आहे . भारत सरकारच्या नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीकडून खेळाडूवर या अंतर्गत कारवाई करण्यात येते . यामुळे आपल्या शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्यावर दीर्घकाळ टिकणारा परिणाम होऊ शकतो.

सुदृढ शरीरासाठी इंजेक्शन कशाला ? पालकांनी लक्ष देण्याची गरज सुदृढ शरीरासाठी नियमित व्यायाम व कसरतीची आवश्यकता असते . त्यामुळे इंजेक्शन कशाला , असा सवाल करण्यात येत आहे . अग्निवीर भरतीमध्ये जो गैरप्रकार झाला , तो पोलिस भरतीच्या शारीरिक चाचणीमध्ये होणार नाही . स्टेरॉईडमुळे करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे असा कुठलाही गैरव्यवहार करण्याआधी नक्की विचार करायला हवा . आपला पाल्य शरीर सुदृढतेसाठी इंजेक्शन तर घेत नाही ना , याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. २१० जागांसाठी १५ हजार अर्ज पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत पोलिस शिपाई या २१० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे . त्यासाठी १५ हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *