अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या पाठपुराव्याला यश – शिरूर तालुक्यातील परंपरागत कुंभार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची गावनिहाय यादी तयार होणार…

बातमी : विभागीय संपादक, रवींद्र खुडे

दि. 25/05/2021

चौकट –
[ शिरूर तालुक्यातील परंपरागत कुंभार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची गावनिहाय माहिती संकलनाचे काम सुरू झाले असुन, लवकरात लवकर यादी तयार करण्याच्या सुचना सर्व मंडल अधिकारी व तलाठी यांना देण्यात आल्या आहेत –
श्रीमती एल. डी. शेख, तहसीलदार, शिरूर ]

  अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनरावजी जगदाळे यांच्या नेतत्वाखाली २१ जाने २०१९ च्या शासन परिपत्रकाच्या अंमलबजावणी साठी संपुर्ण महाराष्ट्रात पाठपुरावा सुरू होता.

       शिरूर च्या तहसिलदार एल डी शेख यांनी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या मागणीची दखल घेऊन तालुक्यातील सर्व सर्कल व  तलाठी यांना दिनांक १९ मे २०२१ रोजी आदेश काढले असुन, परंपरागत कुंभार व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजातील व्यक्तींचे सर्वेक्षण करुण गावनिहाय यादी तयार करण्याचे काम सुरू झाले. याकामी निवासी नायब तहसिलदार श्रीशैल व्हट्टे, महसुल नायब तहसिलदार ज्ञानदेव यादव यांचे सहकार्य लाभत आहे.
 पुण्याचे जिल्हाधिकारी यांना विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन जगदाळे, माती कला बोर्डाचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता डाळजकर, प्रदेश अध्यक्ष शाम राजे, वरिष्ठ प्रदेश कार्याध्यक्ष संतोष पाषाणकर, प्रदेश उपाध्यक्ष किसन काळे, प्रदेश संघटक प्रकाश कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हाध्यक्ष नथु कुंभार, जिल्हासचिव भगवान रामचंद्र श्रीमंदिलकर, युवक जिल्हाध्यक्ष मयुर कुंभार, पुणे शहराध्यक्ष जालिंदर कुंभार यांच्यासह जिल्हयातील तालुकाध्यक्ष, पदाधिकारी हे निवेदन देऊन समक्ष भेटून पाठपुरावा करत होते. अखेर दिनांक २५/०३/२०२१ रोजी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी पुणे जिल्ह्यातील प्रांत आधिकारी व तहसिलदार यांना आदेश काढले होते. शासन परिपत्रकामध्ये नमुद तरतुदीचा लाभ देण्याच्या दृष्टीने कुंभार समाजास माती वाहतुक परवाने निर्गत करण्याच्या पद्धतीत सुसूत्रता यावी याकरीता तहसिल पातळीवर तलाठी व मंडल अधिकारी यांचे मार्फत सर्वेक्षण करुण परंपरागत कुंभार व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजातील व्यक्तींची गाव निहाय यादी करावी, सदर यादी तयार करताना जातीचे दाखले असलेल्या व्यक्तींची व जातीचे दाखले नसलेल्या व्यक्तींची स्वतंत्र यादी करावी तसेच तालुक्यातील पीढीजात व्यवसाय करणाऱ्या कुंभार समाजातील ज्या व्यक्तींकडे जातीचे दाखले नाहीत अशा व्यक्तींना जातीचे दाखले देण्यासाठी तालुका स्तरावर स्वतंत्र शिबीर आयोजीत करावे असे आदेशात म्हटले आहे.

               त्याच अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी तालुका स्तरावर तहसिलदार यांना शासन परिपत्रक व आदेशाची प्रती देण्यात आल्या होत्या.

 कुंभार समाजाला अनेक शासकीय योजनांपासून वंचीत रहावे लागले आहे त्या योजना मिळवून देणे. समाजाला योग्य दिशा देऊन  पिढीजात व्यवसाय मडकी, विटा बनविणे इ. पांरपारिक व्यवसायास आधुनिकतेची जोड देऊन समाजाचा विकास करण्यासाठी आखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या माध्यमातुन संपुर्ण महाराष्ट्रात काम सुरू आहे.

मोहनराव जगदाळे, संस्थापक अध्यक्ष आखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था, शिरूरच्या तहसिलदार श्रीमती एल. डी. शेख यांनी कुंभार समाजाच्या प्रश्नांची दखल घेतल्या बद्दल समाजाने त्यांचे आभार व्यक्त केलेत. कुंभार समाजाचे अजूनही अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे, शिरूर तालुक्यातील परंपरागत कुंभार व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची गावनिहाय यादी लवकर तयार झाल्यास समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागतील असे पदाधिकाऱ्यांचे मत आहे.
  जिल्ह्यातील इतर तालुक्यातील तहसिलदार यांनी गाव निहाय यादी तयार करावी अन्यथा अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या वतीने, तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा, पुणे जिल्हा सचिव भगवान श्रीमंदिलकर यांनी दिला.

शब्दांकन – पुणे जिल्हा सचिव (भगवान श्रीमंदिलकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *