भोसरीत सिलेंडरचा काळाबाजार

२९ नोव्हेंबर २०२२

भोसरी


धोकादायकरीत्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला. ही कारवाई भोसरी येथे करण्यात आली. महेश माधवराव मोरे (वय २८, रा. हनुमाननगर, भगत वस्ती, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा धोकादायकरीत्या गॅस रिफिलिंग करीत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार छापा टाकला असता, आरोपी हा घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून छोट्या वापराच्या सिलिंडरमध्ये धोकादायकरीत्या गॅस भरत असल्याचे दिसून आले. या कारवाईत बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *