जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी, विधानसभा अध्यक्षांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप

२२ डिसेंबर २०२२


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी केली जात आहे. जयंत पाटील यांचे एक वर्षासाठी निलंबन करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटलांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप केला जात आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक सुरु आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *