अमेरिकेतुन गिफ्ट आलेल्याचे सांगुन तरुणीची फसवणूक

पिंपरी प्रतिनिधी
०५ ऑक्टोबर २०२२


अमेरिकेहून पाठवलेले गिफ्ट कस्टममध्ये अडकले आहे, असे सांगून गिफ्ट सोडवण्यासाठी तरुणीकडून तब्बल दीड लाख रुपये उकळण्यात आले . ही घटना १६ ऑगस्ट २०२२ रोजी घडली . याप्रकरणी तरुणीने देहुरोड पोलीस ठाण्यात सोमवारी ( दि . ३ ) फिर्याद दिली . त्यानुसार पोलिसांनी यश अग्रवाल याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीशी फिर्यादीची ओळख जीवनसाथी या वेंडींग साईटवर झाली होती . आरोपीने फिर्यादीला सांगितले की , तिच्यासाठी अमेरिकेहून गिफ्ट पाठवले आहे . काही दिवसांनी फिर्यादीच्या फोनवर एका महिलेचा फोन आला , तिने दिल्लीमधील इंदिरा गांधी एअरपोर्टच्या कस्टम डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगितले.

गिफ्टमध्ये महागड्या वस्तू असल्याचे सांगत चार्जेस भरण्यासाठी नाजिस अहमद नावाच्या व्यक्तिचा आयडीबीआय बँकेचा अकाऊंट नंबर पाठवला. फिर्यादीने ३८ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केले. त्या महिलेचा पुन्हा फोन आला .पार्सलमध्ये वीस हजार अमेरिकन डाँलर असुन तुम्हाला परत १ लाख ४८ हजार रुपये सिक्युरिटी डिपाँझिट भरावे लागतील असे सांगितले. याबाबत फिर्यादीने यशला फोन केला असता त्याने पैसे भरण्यास सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *