जनता विद्या मंदिर ज्यु. कॉलेज घोडेगांव क्रिकेट संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

घोडेगाव – मोसीन काठेवाडी

दि. २९ ते ३० ऑक्टोबर २०२३ रोजी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अकलुज जि. सोलापूर येथे झालेल्या शालेय विभागस्तर १९ वर्षाआतील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत पुणे जिल्हयाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जनता विद्या मंदिर ज्यु.कॉलेज घोडेगाव मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी हा संघ पात्र ठरला आहे.

शालेय क्रिकेट स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत घोडेगांव संघाने अहमदनगर ग्रामीण, पिंपरी चिंचवड, व अंतिम सामन्यात पुणे शहराचे नेतृत्व करणाऱ्या स.प. महाविद्यालय संघास पराभव करीत विजेतेपद मिळविले.संपूर्ण स्पर्धेत अतिशय दर्जेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भरणा असणार संघ असतानाही केवळ सांघीक कामगिरीच्या जोरावर मोठ्या धावांचा पाठलाग करून उपांत्य फेरी गाठली.

अंतिम सामन्यात ०८ षटकात ७० धावांचे मोठे लक्ष्य गाठताना घोडेगांव संघाची ४ बाद २३ अशी अवस्था होती. परंतु हर्षदा दांगट या खेळाडूच्या आक्रमक फलंदाजीमुळे एक षटक राखून विजय मिळविला. घोडेगांव संघात पुढील खेळाडुंचा समावेश होता.
१) कु.प्रांजल प्रविण गुळवे (कर्णधार)
२) कु.दिशा रामजी गुप्ता (उपकर्णधार )
३) कु.दिक्षा मनोज थोरात
४) कु.हर्षदा गिरजू दांगट
५) कु.समिक्षा सुनिल ढेरंगे
६) कु.वृषाली दत्तात्रय रोकडे
(७) कु.फिजा सलीम मुजावर ८) कु.सेजल रविंद्र काळे
९) कु.सिद्धी शिवराज काळे
१०)कु.श्रावणी नवनाथ गाडेकर
११) कु.श्रुती विजय विधाटे
१२) कु.दिव्या सुभाष आमुंडकर
१३) कु.तेजस्वी बाळू कावडे
१४) कु.अदिती हरिश्चंद्र गावडे
१५) कु.प्रचिती भरत गव्हाणे
१६) कु.जान्हवी गणपत तळेकर
वरील सर्व खेळाडुंना श्री. राजेंद्र पानसरे व श्री.संजय जाधव सर यांनी मार्गदर्शन केले. ज्यु.कॉलेजचे प्राचार्य श्री.अविनाश कळंबे व उपप्राचार्य श्री.धनंजय पातकर सर यांनी विजेत्या संघाचे स्वागत करून अभिनंदन केले.तर संस्थेचे अध्यक्ष श्री. तुकारामशेठ नामदेवराव काळे, मा.अध्यक्ष श्री. अजितशेठ काळे,सचिव श्री. अक्षयशेठ काळे,न्यु.इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन श्री.बाळासाहेब काळे, समन्वय समिती चेअरमन श्री. राजेश काळे, अँड महेश काळे , नरेंद्र काळे , अँड मुरली काळे ,उपसरपंच सोमनाथ काळे,संचालक अँड. संजय आर्विकर मा.अध्यक्ष श्री.सुरेशशेठ काळे माजी ग्रामपंचायत सदस्य मस्जीत मुजावर ,रंजना गाडेकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी खेळाडू, पालक मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *