रिक्षावाले मीटरप्रमाणे भाडे घेत नसल्याने बसतोय आर्थिक फटका

१० नोव्हेंबर २०२२

प्राधिकरण


पीएमपीएलच्या बसेस प्राधिकरणातून निगडीहून प्रवाशांकरिता ये-जा करीत असतात. आकुर्डी रेल्वे स्टेशन तसेच रावेत , मुकाईं चौंक , बसच्या शटल सुरू आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नाह . त्यामुळे नागरिक रिक्षाने प्रवास करतात. रिक्षावाले मीटरप्रमाणे भाडे घेत नाहीत, भरमसाट दर आकारतात, शेअर रिक्षा नाहीत , अशी तक्रार नागरिक करीत आहेत. निगडी प्राधिकरण परिसरात सार्वजनिक वाहतूक सक्षम नाही. या परिसरात बसच्या फेऱ्या कमी आहेत . प्रवाशांना वेळापत्रक माहीत नसल्याने बस कधी येतात ? याची निश्चित माहिती नसल्याने बसस्टॉपवर बसची वाट बघत ताटकळत थांबावे लागते . तसेच सकाळी व सायंकाळी पुणे अपडाऊन नोकरी तसेच विद्यार्थांची बसला गर्दी असते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *