नवीन वर्षापासून दिव्यांगांना मिळणार दरमहा पेन्शन

२२ डिसेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंडित दिनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी योजनेअंतर्गत दर तीन महिन्यांनी मिळणारे पेन्शन नवीन वर्षापासून दरमहा देण्याचे नियोजन आहे , असे समाज विकास विभागाचे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी बुधवारी दि . २१ सांगितले . शहरातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था संघटनांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक पालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात झाली . त्यावेळी ते बोलत होते . बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी , दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट प्रशासन अधिकारी मुकेश कोळप , वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ . राजेंद्र वाबळे , पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक अशोक सोळंके , रमेश मुसुडगे , क्षेत्रीय अधिकारी सुचित्रा पानसरे , शीतल वाकडे , उमाकांत गायकवाड , सीताराम बहुरे , राजेश आगळे व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थिती होते .

पालिकेच्या वतीने दर तीन महिन्यांनी पेन्शन दिली जात होती . त्यामुळे अनेक दिव्यांगांची गैरसोय होत होती . त्या संदर्भातील तक्रारींची दखल घेऊन उपायुक्त इंदलकर यांनी वरील ग्वाही दिली . तसेच , दिव्यांगांच्या पेन्शनसह पालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजनांमध्ये काळानुरूप बदल करणे , दिव्यांगांचा ऑफलाइन घरो घरी सर्व्हेक्षण करणे , दिव्यांगांच्या कला व क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम राबविणे , दिव्यांगांच्या रोजगाराला चालना देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे यासंदर्भात चर्चा झाली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *