राष्ट्रसंत गाडगे बाबांची ६६ वी पुण्यतिथी शिरूरच्या ढोकसांगवीतील परिटवाडीत उत्साहात साजरी

रवींद्र खुडे.
विभागीय संपादक
२२ डिसेंबर २०२२

शिरूर


शिरूर तालुका परीट समाज व सेवामंडळ, यांनी ढोकसांगवी (परीटवाडी) येथे राष्ट्रसंत श्री. गाडगे बाबा यांची ६६ वी पुण्यतिथी, मंगळवार दि. २०/१२/२०२२ रोजी, जी. प. प्राथ. शाळा परीटवाडी (ढोकसांगवी) येथे मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी प्राथमिक शाळेतील मुलांनी गाडगे बाबांची वेशभूषा केलेली होती. ढोल, ताशा व टाळांच्या गजरात बाबांचे, “गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला” हे भजन म्हणत, बाबांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शिरूर तालुक्यातील मान्यवर मंडळी तसेच परीटवाडीतील अबालवृद्ध तसेच बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला होता. मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे बाबांच्या वेशातील शालेय विद्यार्थी होते. बाबांच्या वेषातील या चिमुरड्यांचे घरोघरी महिलांनी मोठ्या आदराने औक्षण केल्याचे दिसत होते. परीटवाडीच्या नागरिकांनी बाबांच्या स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी दारोदारी सडा व रांगोळी काढलेली दिसली.

मिरवणुकीनंतर ह. भ. प. गणेश महाराज वाघमारे, एस के एच कंपनीचे डायरेक्टर गिरीष शेट्टी साहेब, शिरूर पं. स. चे माजी सभापती विश्वास आबा कोहोकडे, शीरुर न. पा. चे माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, ढोक सांगविचे माजी सरपंच मल्हारी मलगुंडे, गोरखनाथ दळवी सर, विकास अभंग आदी मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले. आलेल्या मान्यवरांचे व ज्येष्ठांचे विकास अभंग यांनी सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी हभप वाघमारे महाराजांचे गाडगे बाबांच्या जीवन चरित्रावर प्रवचन तर शालेय विद्यार्थ्यांची गाडगे बाबांच्या जीवनावरील भाषणे झाली. मनिषा राऊत यांनी बाबांच्या कार्या विषयी माहिती सागितली.


कार्यक्रमासाठी दत्ता शेलार, प्रविण शिंदे, प्रशांत शेलार, मांडवगण फराटा येथील कार्यकर्ते नवनाथ टेंभेकर, शशिकांत ननवरे, सचिन टेंभेकर, दत्ता तुळे, रामदास जाधव, गणेश दळवी, बाळराजे ठेमेकर, अनिल शेलार, बाळासाहेब बो-हाडे, भानुदास तुळे, अक्षय अभंग, गोविंद अभंग, सोमनाथ अभंग, रविंद्र व अभंग, सुनिल (आबा) अभंग, सचिन सु. अभंग, धनंजय अभंग, काळुराम अभंग, काळुराम मु. अभंग, रमेश अभंग, अवि अभंग, प्रदीप अभंग, तुषार अभंग, काळूराम बाराहाते, रतन अभंग, कैलास अभंग, केरु अभंग, ज्ञानेश्वर अभंग, पांडुरंग अभंग, सोमनाथ ग अभंग, नंदू अभंग, प्रकाश अभंग, साहेबराव अभंग, गणेश अभंग, दत्ता ल. अभंग, संजय अभंग, गोपाल अभंग, रविंद्र अभंग, रामदास कदम, गुरुदेव सावरे, सुदाम राऊत, प्रमोद अभंग, विश्वनाथ अभंग, ईश्वर अभंग, शुभम अभंग, शाळेचे मुख्याध्यापक रावसाहेब पवार, ज्ञानोबा शिसोदे सर, अंगणवाडी सेविका सुरेखा अभंग, ग्रामस्थ शितल ससाणे, सुरेखा ससाणे, व परीट वाडीतील बहुसंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य गोरखनाथ दळवी यांनी केले. तर आभार विकास अभंग यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *