दिवाळी फराळाच्या निमित्ताने रंगली दिग्गजांची मैफल….. – दिशा सोशल फाउंडेशनचा उपक्रम

बातमीदार: रोहित खर्गे, पुणे विभागीय संपादक

पिंपरी, ( दि.13 नोव्हेंबर) पिंपरी चिंचवड शहरातील दिग्गजांची दिलखुलास गप्पांची मैफल शुक्रवारी रंगली. निमित्त होते, दिशा सोशल फाउंडेशनच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाचे. ताथवडे येथील रागा हॉटेल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांशी मुक्त संवाद साधत, दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.

शहराच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना एका व्यासपिठावर आणून त्यांच्यात मनमोकळा संवाद घडावा, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन दिशा फाउंडेशन करते. यंदाचे या उपक्रमाचे चौथे वर्ष होते. दिवाळी फराळाबरोबरच विचारांची देवाणघेवाण करत दिलखुलास गप्पा झाल्या. दिशाचा हा उपक्रम अखंडितपणे सुरूच रहावा, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमास खासदार डॉ.अमोल कोल्हे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार गजानन बाबर, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, संचालक बाळासाहेब विनोदे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी उपमहापौर तुषार हिंगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, अपक्ष गटनेते कैलास बारणे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, संतोष कांबळे, अमोल हरपळे, तेजस झोडगे, अनिल लोंढे, संतोष बारणे , उद्योजक राहुल गावडे आदींसह दिशाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांना डॉ.अमोल कोल्हे यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘शिवगंध’ हे पुस्तक भेट देण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर, सूत्रसंचालन नाना शिवले तर आभार बाजीराव लोखंडे यांनी मानले.